नांदेड - जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता पेट्रोलपंप बंद करण्याचा नांदेड जिल्हाधिकारी विपीन इंटनकर यांनी आदेश काढला होता. त्यानंतर पेट्रोलपंप बंदची चर्चा पसरल्यानंतर विविध पंपावर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. त्यानंतर सायंकाळी तातडीने पुन्हा जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय मागे घेतल्याचा सुधारीत आदेश काढला.
नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या 'त्या' आदेशाने पेट्रोलपंपावर एकच गर्दी; पुन्हा आदेश मागे - नांदेड कोरोना
जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता पेट्रोलपंप बंद करण्याचा नांदेड जिल्हाधिकारी विपीन इंटनकर यांनी आदेश काढला होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाने निर्णय घेण्याचे विशेष अधिकार दिले आहेत. त्या अधिकाराचा वापर करत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शहरातील नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील पेट्रोलपंप सोमवार (दि.२३) रोजी दुपारी बारापासून ३१ मार्चच्या रात्री बारावाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. त्यमुळे मोठ्या प्रमाणावर पंपावर गर्दी जमली होती. वाढती गर्दी लक्षात घेता हा निर्णय मागे घेतल्याचा सुधारीत आदेश काढला. आणि पेट्रोलपंप पूर्ववत सुरू राहतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत.