महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये सोशल डिस्टंसिंगची पायमल्ली, आरोग्य विभागातील विविध पदासाठी बेरोजगारांची तौबा गर्दी - नांदेड आरोग्य विभाग परिक्षा

नांदेडमध्ये सोशल डिस्टन्सिंग तीन तेरा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एकाच वेळी हजारो बेरोजगार आरोग्य विभातील कंत्राटी भरतीसाठी आल्याने प्रशासनाच्या नियोजनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नांदेडमध्ये सोशल डिस्ट्रन्सची पायमल्ली
नांदेडमध्ये सोशल डिस्ट्रन्सची पायमल्ली

By

Published : Apr 7, 2020, 1:21 PM IST

नांदेड- नांदेडमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एकाच वेळी हजारो बेरोजगार आरोग्य विभातील कंत्राटी भरतीसाठी आल्याने प्रशासनाच्या नियोजनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकची सेवा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात अधिकचे वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी भरतीसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कंत्राटी पध्दतीने भरतीसाठी आज रोजी थेट मुलाखती घेण्यात येत होत्या. मात्र १०२ जागांसाठी हजारो बेरोजगार व त्यांचे नातेवाईक जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात जमा झाले होते.

प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने मुलाखतीच्या ठिकाणी हजारोच्या संख्येत आलेले उमेदवार व त्यांचे नातेवाईक यांनी मोठी गर्दी केली. याठिकाणी "सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा झाल्याचे पाहायला मिळाले. एवढी मोठी गर्दी जमत असतानाही तिथे मोजकेच पोलीस व सुरक्षारक्षक उपस्थित होते. जिल्हा प्रशासन व रुग्णालय प्रशासनाने योग्य नियोजन केले नसल्याने "सोशल डिस्टन्सिंग" तीन तेरा झाल्याची चर्चा आता सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details