नांदेड - प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०२०-२०२१ या रब्बी हंगामासाठी पीकविमा प्रस्ताव स्विकारणे सुरू झाले आहे. रब्बीतील ज्वारी पिकासाठी पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ही ३० नोव्हेंबर, तर गहू बागायती, हरभरा पिकासाठी १५ डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यात इफ्को टोकीयो कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीच्या वतीने जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत २०२०-२०२१ या रब्बी हंगामासाठी पीकविमा प्रस्ताव स्विकारणे सुरू झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.
पीकनिहाय समाविष्ट तालुके