नांदेड - जिल्ह्यात 3 ऑगस्टला आलेल्या अहवालानुसार 203 नव्या व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. एकूण 1 हजार 106 अहवालांपैकी 854 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 2 हजार 359 वर गेलीय. यातील 1 हजार 20 बरे झालेल्यांची संख्या आहे. सध्या एकूण 1 हजार 232 बाधितांवर औषधोपचार सुरू असून त्यातील 19 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात 7 महिला व 12 पुरुषांचा समावेश आहे. तसेच 66 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय.
रविवारी (2 ऑगस्ट) देगलूर येथील 72 वर्षाची एक महिला, चौफाळा येथील 65 वर्षाचा एक पुरुष, नाटकार गल्ली देगलूर येथील 56 वर्षांच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (विष्णुपुरी) मृत्यू झालाय. तसेच सोमवारी फुलेनगर कंधार 65 वर्षीय महिला जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावली. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या 94 झाली आहे.
आज बरे झालेल्या 66 कोरोना बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 25, मुखेड कोविड केअर सेंटर येथील 13, भोकर कोविड केअर सेंटर येथील 1, खासगी रुग्णालय नांदेड येथील 5, हदगाव कोविड केअर सेंटर येथील 3, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथील 4, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 15 अशा 66 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.