नांदेड - माहूरमध्ये महिनाभरापूर्वी घडलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर फरार असलेले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांना न्यायालयाने जामीन नाकारल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जाधव यांच्याकडून मारहाणीच्या वेळी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करावयाचे असल्याने त्यांना जामीन देऊ नये, असे पोलिसांनी आपल्या जवाबात सांगितल्यानंतर न्यायालयाने समाधान जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळला. लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माहूरमध्ये झालेली मारहाण त्या परिसरात खळबळ उडवून देणारी ठरली होती.
नांदेड जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांचा जामीन फेटाळला - samadhan Jadhav
भाजपचे हिंगोली लोकसभा कार्यकारिणी सदस्य सुमित नरसिंग राठोड हेमांडपंथी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद घेत होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राणघातक मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहूर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. राजकीय वादातून घडलेल्या या घटनेत सुमित राठोड यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ कोणी तरी काढून घेतल्याचीही नोंद झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपाध्यक्ष समाधान जाधव फरार आहेत.
भाजपचे हिंगोली लोकसभा कार्यकारिणी सदस्य सुमित नरसिंग राठोड हेमांडपंथी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद घेत होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राणघातक मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहूर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. राजकीय वादातून घडलेल्या या घटनेत सुमित राठोड यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ कोणी तरी काढून घेतल्याचीही नोंद झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपाध्यक्ष समाधान जाधव फरार आहेत. त्यांनी नांदेडच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
या अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान भारतीय दंड विधान कलम ३०७, ३९५, ३२३, ५०४, ५०६ व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या ३७ (१) (३) कलमान्वये माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकर्णात जाधव प्रमुख आरोपी आहेत. मारहाणीसाठी वापरलेले शस्त्र त्याच्याकडून जप्त करावयाचे आहेत. असा युक्तीवाद सरकार पक्षाने करून अटकपूर्व जामीन अर्ज नाकारण्याची विनंती केली होती. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांना अटकपूर्व जामीन नाकारला आहे. अन्य आरोपींनाही जामीन नाकारला गेला आहे.