महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Couple Committed suicide Nanded: नांदेड हादारलं! सोबत एकत्र मरु, असे म्हणत प्रेमी युगुलाची आत्महत्या - धक्कादायक घटना

नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अंजली थोरात आणि आकाश वाठोरै अशी मृत तरुण आणि तरुणीचे नाव आहे.

Couple Committed suicide Nanded
प्रेमी युगुलाची आत्महत्या

By

Published : Apr 6, 2023, 8:11 AM IST

नांदेड: प्रेमी युगुलाच्या आत्महत्येमुळे नांदेड जिल्हा हादरला आहे. तर घरच्या मंडळीचा प्रेमाला विरोध असल्याने एका प्रेमीयुगुलाने सोबत जगता आले नाही तर काय झाले. सोबत एकत्र मरुत असे म्हणत आत्महत्या केली. जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील दर्याबाई उमरी या गावात आठ दिवसा पूर्वी ही धक्कादायक घटना घडली. शवविच्छेद अहवाल प्राप्त झाल्यानंतर हदगांव पोलिसांनी बुधवारी आकास्मिक मृत्यूची नोंद केली.अंजली थोरात आणि आकाश वाठोरे असे या प्रेमी युगुलाचे नाव आहे.


प्रेमीयुगुलांनी केली आत्महत्या:नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हदगाव तालुक्यातील दर्याबाई उमरी येथील गावात घटना घडली आहे. दोघांनी एकत्र आपली जीवन संपवले. दोघांमध्ये तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते



मैत्रीचे रुपांतर प्रेमात: मयत अंजली थोरात आणि आकाश वाठोरै यांचे प्रेमप्रकरण होते. अंजली ही मूळची अर्धापूर तालुक्यातील पांगरी या गावाची रहिवाशी होती. अंजलीच्या आईचा मृत्यू झाला आहे त्यामुळे ती आजोळी मामाकडेच राहत होती. याच गावातील आकाश सोबत तिची मैत्री झाली होती. पुढे चालून मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही शिक्षणासाठी हदगावला ये-जा करत होते. तर दोन्ही कुटुंबात दु:खाचे वातावरण असून गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण : नुकतेच नाशिकमध्ये एका आईने आपल्या तीन महिन्याच्या चिमुकलीचा खून केल्याची घटना घडली होती. मुंबईमध्ये हॉटेलमध्ये कच्चा पुलाव दिल्याच्या वादामधून चाकू हल्ला झाल्याची घटना देखील घडली होती. आता नांदेडमध्ये रेल्वेच्या टॉयलेटमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा घातपाताचा प्रकार आहे की नाही, याबाबत चर्चा होताना दिसत आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे नागरीकांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा: Nanded Crime News खळबळजनक तपोवन एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह घातपाताची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details