नांदेड - जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) 5 आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या (फेडरेशन) 3 केंद्रांवर एकूण 7 हजार 918 शेतकऱ्यांचा 1 लाख 63 हजार 618 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील तीन केंद्रावर 1 लाख 63 हजार 618 क्विंटल कापूस खरेदी
बुधवारपर्यंत सीसीआयच्या पाच केंद्रांवर 5 हजार 457 शेतकऱ्यांचा 1 लाख 6 हजार 249 क्विंटल आणि फेडरेशनच्या 3 केंद्रांवर 2 हजार 461 शेतकऱ्यांचा 57 हजार 323 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रावर कापूसविक्रीसाठी 37 हजार 551 शेतकऱ्यांनी ऑनलाइन तर 2 हजार 229 शेतकऱ्यांनी ऑफलाइन अशी एकूण 39 हजार 848 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी बुधवारपर्यंत सीसीआयच्या पाच केंद्रांवर 5 हजार 457 शेतकऱ्यांचा 1 लाख 6 हजार 249 क्विंटल आणि फेडरेशनच्या 3 केंद्रांवर 2 हजार 461 शेतकऱ्यांचा 57 हजार 323 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. धर्माबाद येथील केंद्रांवर आजवर विविध कारणांनी 278 क्विंटल कापूस नाकरण्यात आला होता.
- कलदगाव - 922 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 21434 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
- कुटूंर - 1261 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 18128 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
- नायगाव - 1422 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 33447 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
- धर्माबाद - 1306 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 19773 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
- किनवट - 546 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 13510 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
- तामसा - 721 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 14514 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
- पोमनाळा - 1343 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 32876 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
- भोकर - 397 (केंद्रनिहाय शेतकरी संख्या) - 9932 (कापूस खरेदी, क्विंटलमध्ये)
जिल्ह्यातील सीसीआयच्या कुंटूर, किनवट येथे जागेअभावी, तर नायगाव येथील जिनिंगला आग लागल्यामुळे येथील कापूस खरेदी बंद आहे. याशिवाय कामगार नसल्यामुळे बिलोली येथील केंद्र कार्यान्वित झालेले नाही.