महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंधार तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नांदेड, नायगाव येथील संकलन केंद्रावर कापूस विक्री करावा - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर - cotton farmers

शेतकऱ्यांनी दर्जेदार कापुसच (एफ ए क्यू) विक्रीसाठी आणावा असे आवाहन केले. कापूस खरेदी केंद्रांना गठाण वाहतूक, सरकी वाहतूक या व इतर अनुषंगिक बाबीसाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल. कापूस खरेदीसाठी संकलन केंद्रानी इतर कुठलीही सबब पुढे करु नये, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

Cotton growers farmers in Kandahar taluka should sell at Cotton Collection Center in Nanded, Naigaon
कंधार तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नांदेड, नायगाव येथील कापूस संकलन केंद्रावर विक्री करावा - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

By

Published : Apr 11, 2020, 8:34 AM IST

नांदेड- कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. मात्र, याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. अनेक पिके शेतात सडत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बैठक घेतली. अन्नधान्य वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संवाद साधला.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कंधार तालुक्यांसह इतर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादित कापूस विक्रीसाठी येत असलेल्या अडचणीबाबत सविस्तर सूचना डॉ. इटनकर यांनी दिल्या. कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी नांदेड अथवा नायगाव येथील कापूस संकलन केंद्रावर विक्रीसाठी न्यावा, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी दर्जेदार कापुसच (एफ ए क्यू) विक्रीसाठी आणावा असे आवाहन केले. कापूस खरेदी केंद्रांना गठाण वाहतूक, सरकी वाहतूक या व इतर अनुषंगिक बाबीसाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल. कापूस खरेदीसाठी संकलन केंद्रानी इतर कुठलीही सबब पुढे करु नये, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

खरीप हंगामातील बहुतांश कापसाची विक्री झाली असून फार तुरळक प्रमाणात वेचणीसाठी व साठवलेला कापूस शिल्लक असून यातील दर्जेदार कापूस संबंधित संकलन केंद्रावर विक्रीसाठी घेऊन जावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी केल्या आहेत.या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये कंधारचे उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, कंधार तहसिलदार सखाराम मांडवगडे, तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, सहाय्यक निबंधक जी. आर. कौरवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव पी. डी. वंजे यांच्यासह नायब तहसीलदार विजय चव्हाण, ताडेवाड यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details