नांदेड- येथील भोकर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. न्यायाधीश एम.एस.शेख यांनी ही शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा-६०० लोकवस्ती असलेल्या गावाने राबवला प्लास्टिक मुक्तीचा यशस्वी प्रयोग
शिवणक्लाससाठी जाण्याऱ्या मुलीवर केला होता अत्याचार
भोकर शहरातील एक अल्पवयीन मुलगी १० ऑक्टोंबर २०१८ रोजी शिवण क्लाससाठी सकाळी ११ वाजता एकटीच जात होती. दरम्यान, आरोपी योगेश वाघमारे तिला गोकुळनगरमध्ये भेटला. आपण लग्न करू, असे आमिष दाखवून त्याने मुलीला शेतामध्ये नेवून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली होती.
या प्रकरणी पीडित मुलीने अत्याचार झाल्याची तक्रार १५ ऑक्टोंबर २०१८ रोजी पोलिसात दिली. आरोपी योगेश वाघमारे विरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक पूनम सूर्यवंशी यांनी केला. त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी ८ साक्षीदार तपासण्यात आले होते. पुराव्यांआधारे न्यायाधीश एम.एस.शेख यांनी काल (गुरूवारी) आरोपीला ७ वर्षे सक्तमजुरी व ७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. रमेश राजूरकर, ॲड. सलीम अलिमोद्दीन यांनी बाजू मांडली.