नांदेड -जिल्ह्यात बुधवारी (दि. 23 जून) प्राप्त झालेल्या अहवालापैकी 23 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 91 हजार 184 एवढी झाली असून यातील 88 हजार 495 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर पोहोचला आहे.
जिल्ह्यात आता 201 सक्रिय रुग्ण असून त्यांच्याव उचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्केवर आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृतांची संख्या 1 हजार 903 एवढी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 903 एवढी आहे. बुधवारच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका 7, लोहा तालुक्यांतर्गत 4, अर्धापूर 1, परभणी 1, हिमायतनगर 1, कंधार 1 तर अँटीजन तपासणीद्वारे नांदेड महापालिका 3, नायगाव 1, बिलोली 2, हदगाव 1, मुखेड 1, असे एकूण 23 बाधित आढळले.