महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धर्तीवर पूर्वतयारी, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक - कोरोना न्यूज अपडेट नांदेड

जिल्ह्यात कोविडबाधितांचे वाढलेले प्रमाण बऱ्याच अंशी कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र पुन्हा कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू नये, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकिला पालकमंत्री अशोक चव्हाण यांची देखील उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धर्तीवर पूर्वतयारी
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धर्तीवर पूर्वतयारी

By

Published : May 7, 2021, 8:23 PM IST

नांदेड - जिल्ह्यात कोविडबाधितांचे वाढलेले प्रमाण बऱ्याच अंशी कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र पुन्हा कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढू नये, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकिला पालकमंत्री अशोक चव्हाण यांची देखील उपस्थिती होती. बैठकिमध्ये जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणात बाधा झाली. भविष्यात जर तिसरी लाट आलीच तर त्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. जिल्हा प्रशासनातर्फे वृद्धांसह प्रामुख्यांने लहान मुलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करून नियोजन केले जात आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जपणे आवश्यक असून, कोरोनाबाबतची काळजी व सुरक्षीत वर्तण मुलांकडूनही होणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक काळजीचे कारण जरी नसले, तरी भविष्यात वेळेवर धावपळ होण्यापेक्षा आतापासूनच लहान मुलांसाठी कोविड व्यवस्थापन विशेष वार्ड व खाटांचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

जिल्ह्यात 0 ते 17 वयोगटातील लोकसंख्या 20 टक्क्यांच्या आसपास

नांदेड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 33 लाख 61 हजार एवढी आहे. यात शून्य ते 6 वयोगटातील लोकसंख्या ही जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या 13.67 टक्के एवढी आहे. तर शून्य ते 17 या वयोगटातील संख्या विचारात घेता हे प्रमाण 20 टक्क्यांच्या जवळपास येते. या वयोगटातील मुलांच्या आरोग्यासाठी विशेष काळजी व तसे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्यादृष्टिने आजच्या बैठकीत डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, गुरुगोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मुलांसाठी असलेल्या उपचारांच्या सेवा-सुविधेबाबात चर्चा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स निर्माण करून, व्हेंटिलेटर व इतर उपकरणांच्या सुसज्जतेसाठी कृति आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

लहान मुलांच्या दृष्टीने उपाययोजना

मुलांसाठी लागणारी औषधी, त्यांचे वयोगट लक्षात घेता उपचारासमवेत शाररिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी उपाय योजना, लक्षण विरहित कोविड जर मुलांमध्ये आढळला तर त्यादृष्टिने नियोजन याचाही साकल्याने या बैठकीत विचार करण्यात आला. या बैठकीस शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, बालरुग्ण विभाग प्रमुख डॉ. सलिम तांबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सिरसीकर, बालरोग तज्ज्ञ असोसिएशनचे सचिव डॉ. राजेश नुने, डॉ. संदिप पाटील, डॉ. श्रीरामे यांची उपस्थिती होती.

हेही वाचा -एअर ॲम्बुलन्सची तांत्रिक बिघाडाने मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिग; रुग्णासह डॉक्टर सुरक्षित

ABOUT THE AUTHOR

...view details