नांदेड- निजामुद्दीन येथील मरकज येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जाऊन आलेल्या एकाला बुधवारी (दि. 1 एप्रिल) रात्री 10 वाजता हिमायतनगर येथील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आज त्याचा स्वॅब टेस्टिंग अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिक चिंतामुक्त झाले आहेत. असे असले तरी बाजूच्या हिंगोली जिल्ह्यात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरवासीयांनी घराबाहेर पडणे टाळावे आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे
'त्या'चे अहवाल 'निगेटिव्ह'... तरीही काळजी घ्या..! - दिल्लीच्या निजामोद्दीन येथील मरकज बातमी
दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकज येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जाऊन आलेल्या एकाचा 'स्वॅब टेस्ट' निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. पण, जवळच असलेल्या हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
!['त्या'चे अहवाल 'निगेटिव्ह'... तरीही काळजी घ्या..! शासकीय रुग्णालय नांदेड](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6641678-584-6641678-1585891196908.jpg)
संचारबंदी पूर्वी दिल्लीतील मरकज येथे झालेल्या इज्तेमामध्ये गेलेले 11 जण नांदेडमध्ये आल्याचे समजताच जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर जिल्हा पोलीस यंत्रणा सक्रीय झाली, आरोग्य विभागाचीही धांदल उडाली होती. दरम्यान, बुधवारी (दि. 1 एप्रिल) रात्री 11 वाजता हिमायतनगरमध्ये आलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालायाच्या आयसोलेशन वॉर्डमधे ठेवले. दुसऱ्या दिवशी (दि. 2 एप्रिल) त्याला नांदेडला पाठवून त्याचा स्वॅब टेस्टिंग करायला पुणे येथे पाठविला होता. ही माहिती शहरासह जिल्हाभरात पसरल्यामुळे हिमायतनगर शहर व परिसरातील नागरिकांची झोप उडून एकच खळबळ उडाली होती. केव्हा त्या संशयित रुग्णाचा अहवाल येईल आणि सुटकेचे निश्वास घेऊ, असे नागरिकांना वाटत होते. दरम्यान, त्याचा दि. 2 एप्रिल रोजी तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने हिमायतनगर शहरातील नागरिकांसह प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. तरीही बाजूच्याच हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा -नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डातर्फे गोर गरीब गरजूंना घरपोच लंगर सेवा