नांदेड -जिल्ह्यामध्ये कोरोना थांबता थांबेना, अशी परिस्थिती असून गेल्या तीन दिवसात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शुक्रवारी दोन कोरोनाबाधित रुग्ण दगावल्याची बातमी समोर आली असताना सायंकाळी १० रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची बातमी धडकली. यामुळे दोनशेचा आकडा पार केलेल्या कोरोनाग्रस्ताची संख्या थेट आता २३३ पर्यंत पोहचली आहे.
नांदेडमध्ये कोरोना प्रसार थांबेना! शुक्रवारी आणखी १० रुग्ण सापडले; दोघांचा मृत्यू - नांदेड कोरोना स्थिती बिकट
कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी असताना आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे कोरोनाबाधित डॉक्टरांची संख्या आता पाच झाली आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी असताना आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे कोरोनाबाधित डॉक्टरांची संख्या आता पाच झाली आहे. विशेष म्हणजे ४ रुग्ण उपचारासाठी औरंगाबादला गेल्याचे सांगण्यात आले. नांदेडमध्ये आणखी एक डॉक्टर पॉझिटिव्ह सापडला असून कोरोना बाधितांमध्ये ५ वर्षीय मुलीचा समावेश आहे. तसेच ५ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
जिल्ह्यातील सद्यपरिस्थिती -
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 4757
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 4425
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2566
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 159
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 159
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 4293
• आज घेतलेले नमुने - 98
• एकूण नमुने तपासणी- 4809
• एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 234
• पैकी निगेटीव्ह - 4191
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 113
• नाकारण्यात आलेले नमुने - 83
• अनिर्णित अहवाल – 181
• बरे होऊन घरी परतलेले कोरोना रुग्ण - 160
• कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यूसंख्या – 13
• जिल्ह्यात बाहेरून एकूण प्रवासी 1 लाख 44 हजार 361 आले आहेत. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.