महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड कोरोना अपडेट : चोवीस तासात नव्या 236 बाधितांची भर,  सात जणांचा मृत्यू

नांदेडमध्ये गुरुवारी(24 सप्टेंबर) रोजी दिवसभरात 236 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.

corona in nanded
नांदेडमध्ये गुरुवारी(24 सप्टेंबर) रोजी दिवसभरात 236 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे.

By

Published : Sep 25, 2020, 7:02 AM IST

नांदेड -गुरुवारी (24 सप्टेंबर) सायंकाळपर्यंत प्राप्तअहवालानुसार जिल्ह्यात 236 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 76 तर ॲंटिजेन किट्स तपासणीद्वारे 160 बाधित सापडले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 267 रुग्णांमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय.

एकूण 1 हजार 141 अहवालांपैकी 875 अहवाल निगेटिव्ह आले असून आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 14 हजार 436 एवढी झाली आहे. यातील 10 हजार 450 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 3 हजार 537 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 53 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात एकूण 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. बुधवारी (23 सप्टेंबर) रोजी कौडगांव ता. लोहा 75 वय वर्षांचा एक पुरुष , एकता नगर नांदेड 70 वय वर्षाचा एक पुरुष, मुक्रमाबाद ता. मुखेड येथील 24 वय वर्षाचा एक पुरुष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे तर धर्माबाद तालुक्यातील 61 वय वर्षाचा एक पुरुष, बसवेश्वर नगर नांदेड येथील 52 वय वर्षाचा एक पुरुष जिल्हा रुग्णालय कोव्हिड सेंटर नांदेड, मानस नगर नांदेड येथील 70 वय वर्षांची एक महिला खासगी रुग्णालयात तर गुरुवार 24 सप्टेंबर 2020 रोजी किनवट तालुक्यातील धानोरा येथील 60 वय वर्षाच्या एका महिलेचा किनवट कोव्हिड केअर सेंटर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मृतांची संख्या 378 वर पोहोचली आहे.

गुरुवारी सापडलेल्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 51, कंधार तालुक्यात 2, अर्धापूर तालुक्यात 4, भोकर तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 2 , परभणी 1, नांदेड ग्रामीण 4, मुखेड तालुक्यात 4, नायगाव तालुक्यात 3, लोहा तालुक्यात 2, हिंगोली 1, बीड 1 असे एकूण 76 बाधित आढळले.

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 81, हदगाव तालुक्यात 2, धर्माबाद तालुक्यात 11, किनवट तालुक्यात 4, बिलोली तालुक्यात 2, हिमायतनगर तालुक्यात 3, भोकर तालुक्यात 4, देगलूर तालुक्यात 3, अर्धापूर तालुक्यात 2, नांदेड ग्रामीण 4, मुदखेड तालुक्यात 10, लोहा तालुक्यात 5, मुखेड तालुक्यात 18, नायगाव तालुक्यात 5 , कंधार तालुक्यात 2 , उमरी तालुक्यात 2, माहूर तालुक्यात 1, परभणी 1 एकूण 160 बाधित आढळले.

जिल्ह्यातील कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकूण घेतलेले स्वॅब - 75 हजार 878,
निगेटिव्ह स्वॅब- 57 हजार 816,
(24 सप्टेंबर) पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 236,
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 14 हजार 436,
(24 सप्टेंबर) स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2
(24 सप्टेंबर) स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,
एकूण मृत्यू संख्या- 378,
एकूण डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या- 10 हजार 450,
(24 सप्टेंबर) रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 537,

(24 सप्टेंबर) प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 494,
(24 सप्टेंबर) अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 53,
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.17 टक्के

ABOUT THE AUTHOR

...view details