महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक : नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट - nanded corona news

नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 10, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात 8 खाटा उपलब्ध आहेत.

corona-patient-growth-rate-declines-in nanded
corona-patient-growth-rate-declines-in nanded

By

Published : Apr 24, 2021, 10:18 PM IST

नांदेड- जिल्ह्यात बऱ्याच कालावधीनंतर कोरोना रुग्णांची संख्या घटल्याचे दिसून आले. प्राप्त झालेल्या 3 हजार 879 अहवालांपैकी 850 अहवाल कोरोनाबाधित आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 645 तर अँटिजेन तपासणीद्वारे 205 अहवाल बाधितांचे आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 74 हजार 950 एवढी झाली असून यातील 59 हजार 895 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या 13 हजार 391 रुग्ण उपचार घेत असून 200 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

१ हजार 285 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

जिल्ह्यातील 1 हजार 285 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 13, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 18, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 667, मुखेड कोविड रुग्णालय 135, हदगाव कोविड रुग्णालय 12, धमार्बाद तालुक्यांतर्गत 41, बिलोली तालुक्यांतर्गत 22, कंधार तालुक्यांतर्गत 6, देगलूर कोविड रुग्णालय 10, किनवट कोविड रुग्णालय 40, नायगाव तालुक्यांतर्गत 7, अर्धापूर तालुक्यांतर्गत 31, हिमायनगर तालुक्यांतर्गत 40, लोहा तालुक्यांतर्गत 17, उमरी तालुक्यांतर्गत 22, मांडवी कोविड केअर सेंटर 10, माहूर तालुक्यांतर्गत 16, भोकर तालुक्यांतर्गत 46, खासगी रुग्णालय 112 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविडबाधितांची संक्षिप्त माहिती

एकूण घेतलेले स्वॅब- 4 लाख 39 हजार 245

एकूण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 55 हजार 527

एकूण बाधित व्यक्ती- 74 हजार 950

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 59 हजार 895

एकूण मृत्यू संख्या-1 हजार 403

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.91 टक्के

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-32

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-76

प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 13 हजार 391

अतिगंभीर प्रकृती असलेले-200

ABOUT THE AUTHOR

...view details