नांदेड - हातात दंडुका घेऊन शेतकऱ्यांना गर्दी करू नका, असे म्हणणाऱ्या नांदेडचे उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हदगाव शहरातील बँकेत शेतकऱ्यांची गर्दी झालेली दिसत आहे. तिथे महेश वडदकर हातात दंडुका घेऊन शेतकऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी धमकावत आहेत. असे सांगत असताना उपजिल्हाधिकारी यांनी स्वतः मात्र तोंडावर मास्क सोडा पण साधा रुमाल देखील बांधलेला दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम फक्त सर्वसामान्यांना असून अधिकारी वर्गाला नाहीत काय ? असा सवाल नागरिक करत आहेत.
व्हिडिओ : हातात दंडुका घेऊन नियम शिकवणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्याच तोंडाला जेव्हा नसतो मास्क.. - महेश वडदकर
नियम शिकवणाऱ्यांनाच नियमांचा विसर... सोशल डिस्टन्सिंग पाळायला सांगणारे उपजिल्हाधिकारी स्वतः तोंडाला मास्क लावायला विसरले.
नांदेड उपजिल्हाधिकारी
हेही वाचा...पन्नाशीवरील कर्मचाऱ्यांना 'फील्ड ड्युटी' नाही, पुणे पोलिसांचा निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी स्वच्छ हात धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क बांधणे, मास्क न लावल्यास दंडही आकारण्यात येत आहे. हे सर्व नियम सर्वसामान्य नागरिक आपापल्या परीने पाळत आहेत. पण जेव्हा चांगल्या उच्च पदावर असणारे अधिकारी हे नियम धाब्यावर बसवतात. तेव्हा त्यांना दंड का लावू नये, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.