नांदेड - गत आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत असून आज तब्बल 360 व्यक्ती कोरोना बाधित आले आहेत. सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 360 बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे 151 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 209 बाधित आले. याचबरोबर दिनांक 9 मार्च रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 35 वर्षीय महिलेचा व दिनांक 11 मार्च रोजी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुखेड येथील 62 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 610 एवढी झाली आहे.
केवळ 993 तपासणीत 360 बाधित आढळले-
आजच्या 993 अहवालापैकी 619 अहवाल निगेटिव्ह आले. तर तब्बल 360 बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 25 हजार 800 एवढी झाली असून यातील 23 हजार 360 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 614 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 44 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
जिल्ह्यात 1 हजार 614 बाधितांवर औषधोपचार सुरु-
जिल्ह्यात 1 हजार 614 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 76, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 76, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 65, किनवट कोविड रुग्णालयात 27, मुखेड कोविड रुग्णालय 31, हदगाव कोविड रुग्णालय 12, महसूल कोविड केअर सेंटर 114, देगलूर कोविड रुग्णालय 7, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 815, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 260, खाजगी रुग्णालय 131 आहेत.
सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 115, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 16 एवढी आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 45 हजार 960
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 15 हजार 608
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 25 हजार 800
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 23 हजार 360
एकुण मृत्यू संख्या-610