नांदेड - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर १७ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील न्यायिक कामाची वेळ दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत राहणार आहे. तर न्यायालयीन कार्यालय रोज सकाळी साडेअकरा ते साडेतीनपर्यंत सुरु राहणार आहे. असे आदेश जिल्हा न्यायाधीश दीपक धोलकीया यांनी दिले आहेत.
कोरोना इफेक्ट : नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील न्यायिक कामकाजाच्या वेळेत बदल - courts in Nanded district
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला असून जिल्हा न्यायिक विभागातील अभिवक्ता संघात कामकाजाच्या वेळेव्यतिरिक्त कोणीही उपस्थित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पक्षकारांनाही निकड व आवश्यकता असेल तरच न्यायालयात बोलवावे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील न्यायिक कामकाजाच्या वेळेत बदल
हेही वाचा...कोरोना इफेक्ट: श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर बंद