महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CORONA: नांदेड जिल्ह्यात धोकादायक स्थिती; मृत्यूचा आकडा वाढतोय

नांदेड जिल्ह्यात धोकादायक स्थिती वाढत असून कोरोनामुळे मृत्यूचा आकडा वाढत आहे. शनिवारी तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 73 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.

CORONA: नांदेड जिल्ह्यात धोकादायक स्थिती;  मृत्यूचा आकडा वाढतोय
CORONA: नांदेड जिल्ह्यात धोकादायक स्थिती; मृत्यूचा आकडा वाढतोय

By

Published : Mar 27, 2021, 10:39 PM IST

नांदेड - जिल्ह्यात धोकादायक स्थिती वाढत असून कोरोनामुळे मृत्यूचा आकडा वाढत आहे. शनिवारी तब्बल 16 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 73 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 4 हजार 257 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 528 तर अँटिजेन तपासणीद्वारे 545 अहवाल बाधित आहेत. आजचे 1 हजार 73 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 38 हजार 598 एवढी झाली आहे.

बाधितांची संख्या आता 38 हजार 598-

आजच्या 4 हजार 257 अहवालापैकी 3 हजार 61 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 38 हजार 598 एवढी झाली असून यातील 28 हजार 518 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 9 हजार 134 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 108 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती-

एकूण घेतलेले स्वॅब- 2 लाख 97 हजार 480
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 52 हजार 624
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 38 हजार 598
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 28 हजार 518
एकूण मृत्यू संख्या-713
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.88 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-100
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-409
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-9 हजार 134
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-108

ABOUT THE AUTHOR

...view details