नांदेड- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नांदेडमध्ये गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला नसल्याच्या आरोप करत काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नांदेडमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन - debt relife
जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते आणि प्रशासन दोघे मिळून भ्रष्टाचार करत असून त्यांना लोकांच्या प्रश्नाशी काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
कर्जमाफी पूर्णपणे झाली नाही. फक्त २२ ते २५ टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. सरसकट शेतऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, असे चव्हाण म्हणाले. जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते आणि प्रशासन दोघे मिळून भ्रष्टाचार करत असून त्यांना लोकांच्या प्रश्नाशी काहीही देणेघेणे नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
काँग्रेस पक्षातर्फे यापूर्वीही अनेकदा नांदेडमध्ये आंदोलने करण्यात आली. या आंदोलनामध्ये अशोक चव्हाण कधीही दिसून आले नाहीत. यावेळी मात्र, जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात आयोजित आंदोलनात ते सहभागी झाले होते.