महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 28, 2020, 8:56 AM IST

ETV Bharat / state

नांदेडमध्ये काँग्रेसच्या आमदारासह कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची बाधा

शनिवारी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 5 कोरोनाबाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 349 बाधितांपैकी एकूण 275 व्यक्ती कोरोनातून बरे झाले.

nanded covid 19
नांदेड जिल्हा रुग्णालय

नांदेड - जिल्ह्यात शनिवारी काँग्रेसच्या एका आमदाराचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांच्या कुटुंबातील इतर नऊ जणांना सुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच कोरोनावर मात केली होती. आता मात्र पुन्हा एका काँग्रेसच्या बड्या नेत्याला कोरोनाची बाधा झाली आहे.

शनिवारी पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 5 कोरोनाबाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 349 बाधितांपैकी एकूण 275 व्यक्ती कोरोनातून बरे झाले. शनिवार 27 जून रोजी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण 80 अहवालापैकी 62 अहवाल निगेटिव्ह तर 18 नवीन कोरोनाबाधित व्यक्ती आढळले. या सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे. यात आमदारासह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्ह्यात 58 बाधितांवर औषधोपचार चालू असून, यातील 6 कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात वय 50 व 55 वर्षाच्या दोन महिला बाधित आहेत, तर 38, 42, 67 व 75 वय वर्षाचे 4 कोरोनाबाधित पुरुषांचा यात समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यात 58 कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी नांदेड येथे 13, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 39, एक बाधित नांदेड शहरातील खाजगी रुग्णालयात तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 1 कोरोनाबाधित व्यक्ती उपचार घेत आहे. 3 कोरोनाबाधित औरंगाबाद आणि 1 जण सोलापूर येथे संदर्भित झाले आहेत. शनिवार 27 जून रोजी 115 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल आजपर्यंत प्राप्त होणार आहे.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती -

सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 536,
घेतलेले स्वॅब - 6 हजार 133,
निगेटिव्ह स्वॅब - 5 हजार 311,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या - 18,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 349,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - निरंक
मृत्यू संख्या - 16
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 275
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 58
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 115 एवढी संख्या आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details