नांदेड- लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उघडपणे भाजपचे काम करत होते. राष्ट्रवादीच्या दगाबाजी केल्यामुळे चव्हाण पराभूत झाले, असा आरोप भोकरच्या काँग्रेस आमदार अमिता चव्हाण यांनी केला. मुदखेड येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.
राष्ट्रवादीच्या दगाबाजीमुळेच अशोक चव्हाणांचा पराभव; विधानसभेपूर्वीच अमिता यांचा राष्ट्रवादीवर आरोप - नांदेड
पूर्वीपासूनचे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नव्हता. राष्ट्रवादीने काँग्रेसचा विश्वासघात केला असल्याचा आरोप अमिता यांनी केला.
अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यात कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. मात्र, आता नांदेड जिल्ह्यात जाती-पातीचे राजकारण होत आहे. पूर्वीपासूनचे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नव्हता. राष्ट्रवादीने काँग्रेसचा विश्वासघात केला असल्याचा आरोप अमिता यांनी केला.
गेल्या निवडणुकीत झाले गेले आता विसरून जावे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रपणे कामाला लागावे. त्याद्वारे पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवून द्यावा, असे आवाहन अमिता यांनी केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, रोहिदास जाधव, उद्धव पवार, माधव कदम आदी उपस्थित होते.