महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हदगाव मतदारसंघाच काँग्रेसला धक्का; उमेदवारी न मिळाल्याने चाभरेकरांचा शिवसेनेत प्रवेश - maharashtra assembly election 2019

हदगाव विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छूक असलेले गंगाधर पाटील चाभरेकर यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा फटका बसला असल्याचे मानले जात आहे.

काँग्रेसकडून इच्छुक असलेले गंगाधर पाटील चाभरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला

By

Published : Oct 9, 2019, 12:49 PM IST

नांदेड -हदगाव विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छूक असलेले गंगाधर पाटील चाभरेकर यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. चाभरेकर यांना पक्षाने यावेळीही एकदा डावलले त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. चाभरेकर आणि पाथरडकर या दोन्ही गटाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा - 'शिवसेना राममंदिराच्या मुद्द्यावर अजूनही ठाम'

सेनेचे विद्यमान आमदार नागेश पाटील यांना मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. हदगावातील काँग्रेसचे जुन्या पिढीतील निष्ठावान कार्यकर्ते असलेले बाबूराव पाथरडकर हेही सेनेत प्रवेश करणार आहेत. या दोन्ही बड्या नेत्यांना आपलेसे करण्यात आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना यश आले आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा फटका बसला असल्याचे मानले जात आहे. बाबूराव कदम यांच्या बंडामुळे याआगोदर हदगाव जिल्ह्यात चर्चेत आले आहे.

हेही वाचा - 'मंत्रालयाला आग लागली नव्हती; तर ती सुनिल तटकरेंनी लावली होती'

काँग्रेसच्या या नेत्यामुळे हदगावकडे सर्वांचे लक्ष लागलेल आहे. बुधवारी या सर्व नेत्यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन सेना प्रवेश केला आहे. स्वतः उद्धव ठाकरे यांनी चाभरेकर आणि पाथरडकर यांना शिवबंधन बांधले. यावेळी नागेश पाटील यांना बहुमताने निवडून आणा असे आवाहनही ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. दरम्यान आता हे सर्व जुने काँग्रेसचे गट सेनेत गेल्याने हदगावच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा - भारत उत्सवांचा देश, आमच्याकडे हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा - पंतप्रधान

ABOUT THE AUTHOR

...view details