नांदेड - शिवसेना- भाजपच्या युतीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. शिवसेनेचा स्वाभिमान चुलीत गेला असून टायगर आता लाचार झाला आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे. याबरोबरच सरकारी पैशांच्या जोरावर या सरकारच्या घोषणा सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते नांदेडमध्ये आयोजित सभेत बोलत होते.
स्वाभिमान चुलीत गेलेल्या शिवसेनेचा टायगर लाचार - अशोक चव्हाण - लाचार शिवसेना
शिवसेनेचा स्वाभिमान चुलीत गेला असून टायगर आता लाचार झालाय... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची सेना भाजप युतीवर बोचरी टीका... भाजपवाले महात्मा गांधींचे मारेकरी असल्याचाही केला गंभीर आरोप
चव्हाण म्हणाले, दुष्काळ जाहीर होऊनही सरकारकडून कोणतीही मदत देण्यात आली नाही. यांनी फक्त मोठमोठ्या जाहिराती केल्या आहेत. त्यामुळे मतदार जर यांच्या जाहिरातींच्या भुलभुल्लयात अडकडले तर येणाऱ्या काळात हे मतदान प्रक्रियाही बंद करतील, असा आरोपही त्यांनी भाजपवर केला. तसेच भाजपवाले महात्मा गांधींचे मारेकरी असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.
शिवसेने-भाजपवर बोलताना चव्हाण म्हणाले, की शिवसेनेचा स्वाभिमान चुलीत गेला असून टायगर आता लाचार झाला असल्याची बोचरी टीका त्यांनी यावेळी केली. सेना भाजपची युती म्हणजे आपण दोघे भाऊ-भाऊ आणि दोघेही मिळून-मिसळून खाऊ असे सेना भाजपच सुरू आहे.