महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : 'भारत जोडो' यात्रेला महाराष्ट्रात देगलूर मार्गाने सुरुवात, स्वागतासाठी चव्हाणांनी कसली कंबर - महाराष्ट्रात प्रवेश करेल

काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या चांगलीच गाजते आहे. राहूल गांधी यांची कित्येक किलोमीटरची पायपीट आणि त्यात सर्वसामान्यांना सोबत घेत ढवळून काढलेले वातावरण हे या यात्रेचे वैशिष्ट्य ठरत आहे. ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे.Congress leader Ashok Chavan has started preparations to welcome Bharat Jodo Yatra . starting in Maharashtra

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रा

By

Published : Nov 4, 2022, 8:16 PM IST

नांदेड :काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या चांगलीच गाजते आहे. राहूल गांधी यांची कित्येक किलोमीटरची पायपीट आणि त्यात सर्वसामान्यांना सोबत घेत ढवळून काढलेले वातावरण हे या यात्रेचे वैशिष्ट्य ठरत आहे. ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. Congress leader Ashok Chavan has started preparations to welcome Bharat Jodo Yatra . starting in Maharashtra

तामिळनाडूतील कन्याकुमारी पासून सुरू झालेल्या या भारत जोडो यात्रेचा प्रवास केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाब असा असणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात साधरणतः 7 तारखेला दाखल होणार आहे.

प्रतिक्रिया देतांना डी पी सावंत


नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल. जाती-धर्मात व समाजात फूट पाडणारे राजकारण संपवून देशाला एकजूट करणे, हा यात्रेचा उद्देश असल्याचे सांगितले जाते. राहूल गांधी यांच्या या मोहिमेला देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे.

या यात्रेत राज्यातील लाखो काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक यात्रेत सहभागी होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली 25 हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने यात्रेत सहभागी होणार आहेत. हजारो तरुण बाईक रॅली काढून यात्रेला आपला पाठिंबा देणार आहेत. भारत जोडो यात्रेचा 3500 किमीचा प्रवास हा काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. ही भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरपासून महाराष्ट्रमध्ये येत आहे. सात ते 11 नोव्हेंबर दरम्यान ती नांदेड जिल्ह्यात, 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हिंगोली जिल्ह्यात, 15 ते 16 नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात, 16 ते 18 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि 18 ते 20 रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गाक्रमन करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी वाशीम शहरातील अजनखेड, बोराला फाटा येथे १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत समाजातील प्रत्येक घटक या यात्रेत सहभागी होतांना दिसतो आहे. राहूल गांधी यांचा या यात्रेतील साधेपणा सगळ्यांनाच भावत असल्याने, महाराष्ट्रात देखील भारत जोडो यात्रेचे असेच जल्लोषात आगमन झाले पाहिजे, यासाठी माजी मंत्री व कॉग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. Congress leader Ashok Chavan has started preparations to welcome Bharat Jodo Yatra . starting in Maharashtra . Bharat Jodo Yatra

ABOUT THE AUTHOR

...view details