नांदेड - देशभरासह नांदेड जिल्ह्यातही काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात मोर्चा काढला आहे. पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. देशातील शेतकरी आणि कामगार कायदा, हातरस येथील घटना आदी मुद्द्यावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारचा निषेध केला.
शहरात बैलगाडी मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांना शेतकरी आणि कामगार कायद्याच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने निवेदन देण्यात आले.
अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा हेही वाचा-'बेटी बचाव'चा नारा देणाऱ्या मोदींना 14 दिवसात हाथरसच्या मुलीची सांत्वना का करता आली नाही?'
मोर्चाबाबत अशोक चव्हाण म्हणाले...
हा मोर्चा शेतकरी आणि कामगारांच्या सन्मानार्थ काढला असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, की काँग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. लोकसभेतील नवीन कायदा हा शेतकरीविरोधी आहे. राहुल गांधी यांना पोलिसांनी केलेली धक्काबुक्की निषेधार्थ आहे. दोन-तीन प्रश्नांनी देशात अत्यंत भयानक स्वरुप प्राप्त केले आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सुरेखा येवनकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे उपस्थित होते. त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, तिरुपती कोंढेकर, विठ्ठल पावडे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चामध्ये उपस्थित होते.
हेही वाचा-ईटीव्ही भारत विशेष : वर्ध्यात टाकाऊ साहित्यातून साकारले महात्मा गांधी अन् विनोबांचे शिल्प