महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसला खिंडार; मुदखेड पंचायत समिती सभापतींचा वंचितमध्ये प्रवेश - nanded political news

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळख असलेले भोकर मतदारसंघातील मुदखेड पंचायत समितीचे सभापती बालाजी सूर्यतळे यांनी काँग्रेसला आज रामराम ठोकत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. पदावर असूनही वरिष्ठ नेते आम्हाला भेटत नाहीत, आम्हाला विचारत नाहीत, साहेबांच्या भेटीसाठी दिवसेंदिवस वाट पाहावी लागते, अशी नाराजी त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

बालाजी सूर्यतळे
बालाजी सूर्यतळे

By

Published : Aug 23, 2020, 8:08 PM IST

नांदेड - पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले भोकर मतदारसंघातील मुदखेड पंचायत समितीचे सभापती बालाजी सूर्यतळे यांनी काँग्रेसला आज रामराम ठोकत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला हा चांगलाच धक्का मानला जात आहे.

पदावर असूनदेखील वरिष्ठ नेते मंडळी आम्हाला भेटत नाहीत, आम्हाला विचारत नाहीत, साहेबांची भेट घेण्यासाठी दिवसेंदिवस वाट पाहावी लागते, अशी नाराजी त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील विद्यमान सभापतीने प्रवेश केला आहे. याचा राजकीय कमी-जास्त परिणाम होणारा असला तरी सत्ताधारी काँग्रेसला नामुष्की सहन करावी लागली आहे. या निमित्ताने काँग्रेसमध्ये असणारा राजकीय वचक मात्र, यानिमित्ताने शिथिल होत असल्याची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.

शिवसेना करणार वंचित सोबत युती?

मुदखेड शिवसेनेचे पदाधिकारी विश्वांभर पवार यांनीही वंचित बहुजन आघाडीसोबत पंचायत समितीत शिवसेना युती करणार असल्याचेही जाहीर केले. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असे जरी समीकरण असले तरी जिल्ह्यात व मतदारसंघात मात्र येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणासोबत हे पाहणेही तितकेच उत्सुकतेचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details