नांदेड -उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांना क्रूरपणे गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. तसेच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याशी यूपीमध्ये झालेली गैरवर्तणूक आणि मुस्कटदाबीचाही यावेळी नांदेड येथील आयटीआय चौकात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निषेध करून आंदोलन करण्यात आले.
लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना क्रूरपणे गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये काँग्रेसचे आंदोलन - लखीमपूर खिरी प्रकरणी काँग्रेसचे आंदोलन
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथील शेतकऱ्यांना क्रूरपणे गाडीखाली चिरडल्याच्या व योगी सरकारने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आयटीआय चौकांमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
![लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना क्रूरपणे गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये काँग्रेसचे आंदोलन congress andolan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13259334-711-13259334-1633355346158.jpg)
congress andolan
नांदेडमध्ये काँग्रेसचे आंदोलन
योगी सरकारने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आयटीआय चौकांमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर विजय यवनकर, संजय आप्पा बेळगे, किशोर स्वामी, नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंढेकर, नगरसेवक संदीप भाऊ सोनकांबळे, नगरसेवक अब्दुल गफार, रेखाताई चव्हाण, कळसकर संजय देशमुख लहानकर, संभाजी भिलवंडे, सुषमा थोरात, भालचंद्र पवळे, जाधव, व्यंकटराव मुदिराज, बालाजी कारेगावकर व नगरसेवक, पदाधिकारी, महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
Last Updated : Oct 4, 2021, 7:43 PM IST