महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra in Nanded : राहुल गांधींना 'झेडप्लस' सुरक्षा कवच ; भारत जोडो यात्रेसाठी प्रशासनाकडून तयारी

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेदरम्यान सुरक्षा व्यवस्थेच्या प्रश्नावरून पोलिस यंत्रणा 'अलर्ट मोड' वर (Nanded security and police system on alert mode) आहे. अशी माहिती नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली (Bharat Jodo Yatra in Nanded) दिली.

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रा

By

Published : Nov 3, 2022, 9:35 AM IST

नांदेड :काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेदरम्यान सुरक्षा व्यवस्थेच्या प्रश्नावरून पोलिस यंत्रणा 'अलर्ट मोड' वर (Nanded security and police system on alert mode) आहे. या यात्रेदरम्यान वाहतूक वळविण्याचे मोठे आव्हान या यंत्रणेसमोर आहे. ही यात्रा सुरळीत व्हावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी 'मास्टर प्लॅन' तयार केला जात आहे. राहुल गांधींच्या सुरक्षेसाठी बाहेर जिल्ह्यातून ६० पेक्षा अधिक पोलिस अधिकारी नांदेडमध्ये दाखल होणार असून त्यांची 'झेड प्लस' सुरक्षा व्यवस्था समोर ठेवून सुरक्षेचे नियोजन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने केले जात असल्याची माहिती नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली (Bharat Jodo Yatra in Nanded) दिली.

'झेडप्लस' सुरक्षा कवच :देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि अन्य ज्वलंत विषयांवर मोदी सरकार विरोधात रान पेटविण्यासाठी राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे. 'भारत यात्री', 'अतिथी यात्री'सह राहुल गांधी यांचा नांदेडमध्ये सहा दिवस आणि सात रात्र मुक्काम असणार आहे. राहुल गांधी यांना 'झेडप्लस' सुरक्षा कवच असल्याने या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात पोलिस प्रशासनाने व्यूहरचना आखली (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) आहे.

नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी


मोठा प्रतिसाद :विशेष म्हणजे 'भारत जोडो' यात्रा नांदेडमध्ये प्रवेश करणार आहे, त्याच दिवशी या यात्रेला दोन महिने पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त वेगळे 'सेलिब्रेशन' करण्याची तयारी स्थानिक काँग्रेसने केली आहे. कन्याकुमारी येथून काश्मीरपर्यंत निघालेल्या या यात्रेला विविधस्तरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात या यात्रेचे स्वागत आणि पदयात्रेचे नियोजन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.

जम्बो बैठक :७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आणि विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी प्रशासकीय कार्यालयाच्या यंत्रणेची जम्बो बैठक पार पडली. या प्रत्येक विभागाला वेगवेगळ्या सूचना बैठकीत जिल्ह्यातील सर्व शासकीय देत यात्रेची जबाबदारी निश्चित प्रमुख अधिकारी केली आहे. यानंतर सर्वच शासकीय उपस्थित होते. यावेळी राऊत यांनी कार्यालयात जोरबैठका सुरू (Bharat Jodo Yatra security and police system) आहेत.


पोलीस यंत्रणेवर ताण :'भारत जोडो' यात्रेच्या सुरक्षेचा सर्वाधिक ताण पोलीस यंत्रणेवर असणार आहे. या दृष्टिकोनातून या यंत्रणेची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेदरम्यान सुरक्षेसाठी बाहेर जिल्ह्यातून पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा मागविण्यात आला आहे. यामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या सुमारे ६० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि होमगार्ड यांची तैनाती केली जाणार आहे. हा सर्व फौजफाटा पुढील काही दिवसांत नांदेडमध्ये दाखल होणार आहे. राहुल गांधी यांची सुरक्षा पायी चालत चालत करावी लागणार आहे, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस अधिकाऱ्याची निवड करताना त्यांचा 'फिटनेस' हा निकष महत्त्वाचा असणार आहे.

३०० जणांचा ताफा :भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या समवेत ३०० जणांचा ताफा असणार आहे. तसेच ठिकठिकाणी हजारो 'अतिथी यात्री' सहभागी होणार आहेत. या काळात राहुल गांधी (Congres leaders Rahul Gandhi) यांचा मुक्काम फिरत्या कंटेनरमध्ये असेल, या कंटेनरमध्ये बेड, टॉयलेट एखाद्या खोलीत जशी सुविधा असते तशी सुविधा करण्यात आली आहे. यात्रेमध्ये एकूण ६० कंटेनर असतील ते सर्व कंटेनर राहुल गांधी मुक्काम करत असलेल्या गावात आधीच पोहोचतात. एका कंटेनरमध्ये १२ विश्रांती घेऊ शकतात, अशी व्यवस्था आहे. प्रत्येक कंटेनर हे ६० फूट लांबीचे असून त्याच्या पार्किंगसाठी ४ ते ५ एकर मोकळी जागा आवश्यक आहे.


पोलीस यंत्रणेसमोर वाहतुकीचे आव्हान :नांदेडमध्ये सध्या वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे, अनेक भागांतील रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे यात्रेदरम्यान वाहतूक वळविण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे. शहरातील दोन्ही वाहतूक शाखा, महामार्ग पोलिस यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या जात आहेत. तसेच या शाखेत पूर्वी काम केलेले अधिकारी, कर्मचारी यांना सहाय्यासाठी बोलावले जाणार (Bharat Jodo Yatra) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details