महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सारी'च्या संशयित रुग्णावर लक्ष केंद्रीत करा; जिल्हा प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सारीच्या आजाराने अनेकांचा बळी घेतल्याने नांदेडची आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. कोरोना आणि सारी आजाराच्या लक्षणांमध्ये बरेच साम्य असल्याने अशा रुग्णांचे स्वॅब घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नांदेड
नांदेड

By

Published : Apr 15, 2020, 2:47 PM IST

नांदेड - कोरोना आणि सारी आजाराची लक्षणे सारखीच असल्याने वैद्यकीय यंत्रणेने सारी तसेच आयएलआय सदृश्य रुग्णांवर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागात असे संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांचे स्वॅब घेण्यात यावे, अशा सूचना जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात सारीमुळे अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर खबरदारी म्हणून जिल्ह्यातही विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या कोरोना यादीत नांदेडमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण सापडला नसल्याने दुसऱ्या टप्प्यात प्रशासनाला आणखी खबरदारी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा -वेगळा रंग देवून आग लावण्याचा प्रयत्न कोण करणार असेल तर याद राखा !

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात सारीच्या आजाराने अनेकांचा बळी घेतल्याने नांदेडची आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. कोरोना आणि सारी आजाराच्या लक्षणांमध्ये बरेच साम्य असल्याने अशा रुग्णांचे स्वॅब घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. सारी या आजाराची लक्षणे दिसत असल्यास त्याची कोरोना टेस्ट करा, असे त्यांना सांगण्यात आले आहे. म्हणून कोरोनासोबतच सारी आजारवरही बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेचे काम आणखी वाढले आहे. या आजारात सर्दी होणे, तापाचे प्रमाण जास्त असणे, खूप अशक्तपणा येणे, छाती दुखणे, न्युमोनिया अशी लक्षणे आढळून येतात, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा -समाज माध्यमांचा गैरवापर अराजकता माजवण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा - गृहमंत्री देशमुख

प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती आणि लहान मुलांना याचा जास्त धोका असतो. यामुळे आरोग्य विभागही या आजाराकडे गंभीरतेने पाहत आहे. या आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details