महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड: अयोध्या प्रकरणातील निकालाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या ३५ जणांविरुद्ध गुन्हा - Ahmed nadim Protest News nanded

अयोध्येतील राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध जुन्या नांदेडमधील मालटेकडीला जाणाऱ्या मार्गावर काही तरुण गोळा झाले होते. तरुणांना या मार्गावर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे जमावबंदी व कलम १८८ व १३५ चे उल्लंघन केल्याबाबत पोलीस कर्मचारी सूर्यकांत मेहरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवर ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उप-विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इतवारी, नांदेड

By

Published : Nov 17, 2019, 11:15 AM IST

नांदेड- अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करणाऱ्या ३५ जणांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ३५ जणांनी जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करत घोषणाबाजी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर सदर कारवाई करण्यात आली आहे.

अयोध्येतील राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध जुन्या नांदेडमधील मालटेकडी येथे जाणाऱ्या मार्गावर काही तरुण गोळा झाले होते. तरुणांनी या मार्गावर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे जमावबंदी व कलम १८८ व १३५ चे उल्लंघन केल्याबाबत पोलीस कर्मचारी सूर्यकांत मेहरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवर इतवारा पोलीस ठाण्यात अहमद नदीम, शेख इब्राहीम, आबिद अली, शेख एजाज अहमद व इतर ३० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details