नांदेड- कोरोनाशी घरी बसुन लढू पण पोटाचं काय? असा प्रश्न हातावर पोट असणाऱ्या अनेकांना पडलाय. कोरोनाच्या फैलावानंतर अनेक मजूर आणि शेतकऱ्यांच्या पुढं हा गंभीर सवाल उभा टाकलाय. अशा कुटूंबाना आधार देण्याचं काम मुखेडकरांनी केलं आहे.
हातावर पोट असणाऱ्यांना मुखेडकरांचा मदतीचा हात..आवाहनाला दानशूरांचा प्रतिसाद - हातावर पोट असणाऱ्यांना मुखेडकरांचा मदतीचा हात
घरीबसून कोरोनाचा फैलाव टाळण्यास मदत करु परंतू पोटाचं काय? असा सवाल अनेक मजूर आणि शेतकऱ्यांच्या पुढं उभा ठाकलाय. अशा कुटूंबाना आधार देण्याचं काम मुखेडकरांनी केलं आहे.
नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांनी स्वतःपासून या मदत कार्याला सुरुवात केली. मात्र रिकामे हात मदत मागायला येतच होती. ही परिस्थिती पाहून नगरसेवक प्रा.आडेपवार यांनी समाज माध्यमावर मदतीसाठी आवाहन केलं. त्याच्या आवाहनाला मुखेड मधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आडेपवार आणि मित्रमंडळाने मदत म्हणून एक किट बनवली आहे. त्यात गहू, तांदुळ, मिठपुडा, तेल, मिरची, हळद, साबण, दाळ, साखर, पत्ती, जीरा, दाळवा, कपडयाची साबण,भांडी साबण, बिस्कीट असे आठ ते दहा दिवस पुरेल असे साहित्य आहे. सोशल मिडीयातून मिळालेल्या या प्रतिसादाचा पीडित कुटूंबाना आधार मिळाला आहे. तर दानशूरांनीदेखील आपले हात मदतीसाठी पुढं केले आहेत. समाज माध्यमाचा वापर करत केलेल्या उपक्रमाचं नांदेकरांनी कौतुक केलं आहे.
TAGGED:
नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार