महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौतुकास्पद : नांदेड जिल्हाधिकार्‍यांच्या पत्नीची शासकीय रुग्णालयात प्रसूती - collector vipin itankar nanded news

कोरोना काळात नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी त्यांच्या पत्नीची प्रसूती शासकीय रुग्णालयात केली असून त्यांच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. शासकीय रुग्णालयात उत्तम उपचार मिळतात हेच दाखवून देत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एक नवा आदर्श घालून दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून त्यांचे कौतुक होत आहे.

नांदेड जिल्हाधिकार्‍यांच्या पत्नीची शासकीय रुग्णालयात प्रसूती
नांदेड जिल्हाधिकार्‍यांच्या पत्नीची शासकीय रुग्णालयात प्रसूती

By

Published : Aug 20, 2020, 7:41 PM IST

नांदेड : सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवा दर्जेदार भेटत नसल्याचा समज सामान्य लोकांमध्ये आहे. परंतु, या समजाला नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी छेद दिला आहे. कोरोना काळात नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी त्यांच्या पत्नीची प्रसूती शासकीय रुग्णालयात केली असून त्यांच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले आहे.

नांदेड जिल्हाधिकार्‍यांच्या पत्नीची शासकीय रुग्णालयात प्रसूती

जिल्हाधिकारी इटनकर हे पत्नीची प्रसूती कुठल्याही खासगी अलिशान रुग्णालयात करू शकले असते. परंतु, त्यांनी श्यामनगर येथील शासकीय महिला व बाल रुग्णालयात प्रसूती करुन घेतली. शासनाच्या रुग्णालयांविषयी सामान्यांच्या मनात विश्वास वाढवण्याचे काम डॉ. इटनकर यांनी केले. मध्यमवर्गीय नोकरदार वर्ग व्यापारी माणूस उपचारासाठी कधीही शासकीय रुग्णालयात जात नाही. खासगी महागड्या रुग्णालयात उपचार घेत असतात. मात्र, जिल्हाधिकारी इटणकर यांची पत्नी याला अपवाद ठरली आहे.

शासन योजना आणि सुविधा या सामान्यांसाठी आहेत. तरी या योजनांवर किंवा सुविधेबाबत अधिकाऱ्यांनी जागरूक राहून उपचार व सेवा घेतल्यास संबंधित यंत्रणा ही जबाबदारीने काम करते. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्नीची प्रसूती शासकीय रुग्णालयात करून घेत सामान्य लोकांना एक आदर्श घालून दिला आहे. साधी राहणी उच्च विचारसरणी असलेले जिल्हाधिकारी इटनकर यांचे अनेक पैलू नांदेडकरांनी गेल्या पाच महिन्यात पाहिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलाही बडेजावपणा न करता नांदेड येथील शासकीय महिला रुग्णालयात आपल्या पत्नीला दाखल करून त्याच ठिकाणी प्रसूती करण्यास सांगितले. शासकीय रुग्णलयात उत्तम उपचार मिळतात हेच दाखवून देत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एक नवा आदर्श घालून दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून त्यांचे कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details