नांदेड- शहरात झालेल्या तीन जिल्ह्यांच्या सिंचन बैठकीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे डुलक्या घेत असल्याचे कैमेऱ्यात कैद झाले आहे. या बेठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थिती होती. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या या वागण्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे ते किती गंभीर आहेत हे दिसून आले आहे.
VIDEO : सिंचन बैठकीत अशोक चव्हाण देत होते सूचना, तर जिल्हाधिकारी घेत होते डुलक्या
नांदेडसह परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यातील सिंचनाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या बैठकीत नांदेडच्या जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना चांगलीच डुलकी लागली. पालकमंत्री चव्हाण जसजशा सूचना आणि उपाययोजना सुचवू लागले तसतसे जिल्हाधिकारी डोंगरे जांभया देत होते.
नांदेडसह परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यातील सिंचनाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या बैठकीत नांदेडच्या जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना चांगलीच डुलकी लागली. पालकमंत्री चव्हाण जसजशा सूचना आणि उपाययोजना सुचवू लागले तसतसे जिल्हाधिकारी डोंगरे जांभया देत होते. झोपेपासून सुटकारा मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या चष्म्याची काडी डोळ्यात घालत होते तसेच हाताचे नखही खात होते. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सिंचनाच्या पाण्याबद्दलच्या सूचना जिल्हाधिकारी डोंगरे यांना रटाळवण्या वाटू लागल्याने की काय त्यांनी मस्त डुलक्या घेतल्या. त्यांच्या हालचाली आणि झोप पाहता पालकमंत्री चव्हाण यांच्या सूचनांचा त्याना त्रागा झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा-नांदेड महापालिका सुडाचे राजकारण करतेय - प्रविण साले