नांदेड- नारायण राणे भाजपसोबत आहेत. तसेच ते भाजपचे खासदार आहेत. मात्र, त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला भाजपसोबत घ्यायचे की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही. शिवसेनेसोबत चर्चा करून हा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज महाजनादेश यात्रेमध्ये ते बोलत होते.
हे वाचलं का? - मिशन विधानसभा : मुख्यमंत्री दोन दिवसात पाच विधानसभा मतदारसंघांना देणार भेट
वंचित बहुजन आघाडी बी टीम म्हणणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता बी टीम झाली आहे. येत्या काळात विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्ष नेता असेल, असेही ते यावेळी म्हणाले.
हे वाचलं का?- अखेर नारायण राणेंचा भाजप प्रवेश ठरला; 1 सप्टेंबरला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह भाजपात
कोकणात वाहून जाणारे 300 टिएमसी पाणी मराठवाड्यात वळवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच त्यांनी शरद पवारांवर देखील भाष्य केले. शरद पवार मोठे नेते आहेत. मात्र, त्यांनी काळाची पाऊले ओळखली पाहीजे. त्यामुळे त्यांच्या पक्षावर भरोसा राहिला नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.