नांदेड जिल्ह्यात पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारीपर्यंत बंद ; जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश
नांदेड जिल्ह्यात पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे ( Classes I to VIII in Nanded district closed till January 30 ) आदेश देण्यात आले आहेत. वाढत्या कोरोना प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आदेश ( District Magistrate's order to stop Corona ) दिले आहेत.
नांदेड : राज्यात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आता ऑफलाईन सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद कराव्या लागत आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर ( District Magistrate Dr.Vipin Itankar ) यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला आहे. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले ( Classes I to VIII in Nanded district closed till January 30 ) आहेत. तथापि विद्यार्थी जर घरीच बसून ऑनलाईन माध्यमाद्वारे शिक्षण घेत असेल तर त्याला काही व्यत्यय येणार नाही. परंतु, इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग कोरोना विषयक नियमांचे पालन करुन प्रत्यक्ष सुरू राहतील. त्याचबरोबर कोविड-19 विषयक सर्व नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन शाळा व्यवस्थापनाने करणे बंधनकारक आहे.