नांदेड - धर्माबाद पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीदरम्यान मंगळवारी शहरात प्रचंड राडा झाला. यावेळी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज केला.
हेही वाचा -नांदेडमध्ये महापालिका विरोधी पक्षनेते पदाबाबद आज निर्णय

धर्माबाद पंचायत समितीमध्ये एकूण चार सदस्य असून भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. सभापती पद हे ओबीसी प्रवर्गासाठी असल्यामुळे शिवसेनेचे मारोती कागेरू यांची निवड निश्चीत झाली असली, तरी उपसभापती पद हे काँग्रेसला जावे यासाठी हा राडा झाला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने काँग्रेसला उपसभापती पदासाठी मतदान करण्याचा व्हीप काढला असून तो व्हीप सदस्यांना देताना हा राडा होता. यावेळी शिवसेनेचे सदस्य मारोती कागेरू यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली.
हेही वाचा -एका महिन्याचे घरगुती वीजबिल तब्बल दीड लाख रुपये; सामान्य ग्राहकाला महावितरणाचा जोरदार झटका
या गोंधळात उमेदवारी नामांकन भरण्यास उशिर झाल्यामुळे त्यावरही आक्षेप घेण्यात आलेले आहे. बापूसाहेब देशमुख गोरठेकर, विनायकराव कुलकर्णी, शिवसेनेचे उमेश मुंढे, आकाश रेड्डी, गणेश गिरी, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, हा गोंधळ आवरताना पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्यामुळे धर्माबादमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
TAGGED:
nanded panchayat samiti news