महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्लॉटच्या मालकी वादावरून दोन माजी नगराध्यक्षांच्या गटात तुंबळ हाणामारी; १८ जणांवर गुन्हे दाखल - १८ जणांवर गुन्हे दाखल

प्लॉटच्या मालकी वादावरून दोन माजी नगराध्यक्षाच्या गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना धर्माबादमध्ये समोर आली आहे; या प्रकरणी १८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दोन माजी नगराध्यक्षांच्या गटात तुंबळ हाणामारी
दोन माजी नगराध्यक्षांच्या गटात तुंबळ हाणामारी

By

Published : Mar 11, 2021, 10:41 AM IST


नांदेड - धर्माबाद येथील तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या प्लाटच्या मालकी वादावरून मंगळवारी दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत सात जण किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटातील माजी नगराध्यक्ष आणि इतर १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ मात्र सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे.

माजी नगराध्यक्षांच्या गटात तुंबळ हाणामारी
दोन्ही गट आमने-सामने अन तुंबळ हाणामारी-

धर्माबाद शहरातील तहसील कार्यालयाच्या रस्त्यावरील सर्वे नंबर १९३ सी व सर्वे नंबर १९३ ए या प्लाटच्या मालकीवरून दोन्ही गटात वाद निर्माण झाला. या वादातून दोन्ही गटात हाणामारी झाली. या हाणामारीत काठी, दगड आणि मिरची पावडरचा वापर करण्यात आला आहे.

परस्पर विरोधी गुन्हे दाखल -

नरसूबाई देवन्ना भंडरवाड रा.फुलेनगर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून माजी नगर सभापती गंगाधर गौड तोटेवाड, राजन्ना पेंन्टाजी तोटेवाड, सौ.लक्ष्मीबाई गंगाधर तोटेवाड, पद्माबाई राजन्ना तोटेवाड, श्रीकांत राजन्ना तोटेवाड, शंकर तोटेवाड, माजी नगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, वेणू गोपाल कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडिओचे चित्रीकरण करण्यात नागरिक व्यस्त-

सदरील सिनेस्टाइल हाणामारी होत असताना नागरीक मात्र व्हिडिओ चित्रिकरण करण्यामध्ये मग्न होते. पण कुणीही मध्यस्थी करून भांडण थांबविले नाही. सदरील घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस सहाय्यक निरीक्षक शिवप्रसाद कत्ते घटनास्थळी दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. हा व्हिडिओ मात्र सर्वत्र व्हायरल झाला आहे. दोन्ही माजी नगराध्यक्ष एकाच पक्षातील व वॉर्डातील होते.

दोन्ही गटातील गुन्हे दाखल झालेले-


या प्रकरणात गंगाधर पेंन्टाजी गौड यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोशटी भंडरवाड, गंगाधर भंडरवाड, नरसूबाई भंडरवाड, सुजाता भंडरवार,निता भंडरवाड, विठ्ठल कोंडलवाडे, शंकर कोंडलवाडे, इरन्ना कोंडलवाडे, माजी नगराध्यक्ष दिंगबर लखमावाड, लक्षमण लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश कराड करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details