महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापालिकेच्या शास्तीमाफीनंतरही नांदेडकरांचा प्रतिसाद मिळेना...! - citizens did not response nanded mnc

महापालिकेने मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफीसाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्याचा फायदा काही जणांनी घेतला. मात्र, त्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यात मुदतवाढ द्यावी आणि ती दि. ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी पदाधिकारी आणि सदस्यांनी केली होती.

Nanded MNC
नांदेड महानगरपालिका

By

Published : Dec 20, 2019, 9:09 PM IST

नांदेड -महापालिकेच्या वतीने सध्या मालमत्ता कराची वसुली करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी थकबाकीवरील शास्तीकर (दंड) 100 टक्के माफी देण्याच्या योजनेला दि. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, शास्ती माफ करूनही नांदेडकर कर भरत नसल्याचेच दिसून येत आहे.

महापालिकेने मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफीसाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्याचा फायदा काही जणांनी घेतला. मात्र, त्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यात मुदतवाढ द्यावी आणि ती दि. ३१ डिसेंबरपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी पदाधिकारी आणि सदस्यांनी केली होती. त्यानुसार मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराची चालू मागणी, तसेच थकबाकी भरावी यासाठी आयुक्त लहराज माळी यांनी दि. ३१ डिसेंबर रोजी मुदतवाढ देण्याचे जाहीर केले. त्यानुसार दि. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

हेही वाचा -कचऱ्याच्या डब्यात धुतात चहाचे कप; ठाणे रेल्वे स्थानकातील ओंगळवाणा प्रकार

महापालिका हद्दीत जवळपास 1 लाख १६ हजार मालमत्ताधारक आहे. त्यांच्याकडे जवळपास १८३ कोटी रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. त्यामध्ये जवळपास ५६ कोटी रुपयांची मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्ती आहे. अनधिकृत बांधकाम शास्ती २० कोटी आहे. त्याचबरोबर चालू वर्षाची ६० कोटी रुपयांची मालमत्ता कराची मागणी आहे. मालमत्ता कराची थकबाकी, तसेच चालू मागणी भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत महापौर दीक्षा धबाले, पदाधिकारी आणि सदस्यांनी घेतला आणि त्याला दि. ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

हेही वाचा -धक्कादायक! पुण्यातील महिलांना पाठवले अश्लील मेसेज; 80 वर्षीय पुजाऱ्याला अटक

मात्र, त्याचा फायदा मालमत्ताधारकांनी फारसा घेतला नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. 12 दिवस राहिले शिल्लक पालिकेने आतापर्यंत जवळपास २२ कोटी रुपयांची वसुली केली आहे. आता फक्त 12 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मालमत्ताधारकांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन आयुक्त लहुराज माळी, उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी केले आहे. 1 जानेवारी ते ३१ मार्च या 3 महिन्यांच्या कालावधीत क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध पथकांद्वारे वसुलीची कार्यवाही कडक करण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details