नांदेड -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नांदेड येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एका उत्तरात सांगितले की पुढच्या विधानसभेत विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता हा वंचित बहुजन आघाडीचा असेल. हे पद काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार नाही, अशी भविष्यवाणी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
येणाऱ्या विधानसभेत विरोधी पक्षनेता वंचित आघाडीचा असेल; मुख्यमंत्र्यांची भविष्यवाणी - विरोधी पक्षनेतेपद बातमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी एक प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले.
येणाऱ्या विधानसभेत विरोधी पक्षनेता वंचित आघाडीचा असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भविष्यवाणी
पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणत असल्याचा आरोप होतो, यासंदर्भात प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 'बी' टीम व्हायला लागली आहे. तर, वंचित आघाडी 'ए' टीम व्हायला लागली आहे. मला असे दिसतय की पुढच्या विधानसभेत विरोध पक्ष किंवा विरोधी पक्षनेता वंचितचा असेल तो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा नसेल'