महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंकजा मुंडेंच्या उपोषणावर अशोक चव्हाण म्हणाले.. 'देर आये दुरुस्त आये' - pankaja munde fast

पंकजा मुंडे यांचे उपोषण निश्चितच कामी येईल आणि मी पुढाकार घेईन त्यावेळी त्यांच्या सहकाराची अपेक्षा आहे, अशी आशा असल्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

nanded
मंत्री अशोक चव्हाण

By

Published : Jan 27, 2020, 10:07 PM IST

नांदेड- मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज एक दिवसाचे सार्वजनिक उपोषण केले. त्यावर 'देर आये दुरुस्त आये' असे म्हणत, गेले ५ वर्ष भाजपचे सरकार होते. मात्र, त्यावेळी जर त्यांनी काही केले असते तर मराठवाडा नक्की पुढे गेला असता. त्यावेळी काही केले नाही तर काही हरकत नाही, असा टोला मंत्री अशोक चव्हाण यांनी पंकजा मुंडे यांना लगावला आहे.

प्रतिक्रिया देताना मंत्री अशोक चव्हाण

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. उपोषण सरकारच्या विरोधात नसून मराठवाड्यातील मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी असल्याचे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. यावर मराठवाड्याच्या विकासासाठी मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मराठवाड्यातील सिंचनाच्या प्रश्नाबाबत माहिती दिली. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दुर्देवाने काहीही केले नाही. पंकजा मुंडे यांचे उपोषण निश्चितच कामी येईल आणि मी पुढाकार घेईन त्यावेळी त्यांच्या सहकाराची अपेक्षा आहे, अशी आशा असल्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा-अवैध वाळू वाहतूक करणारे सहा ट्रक ताब्यात; वाळू तस्कर 'रडारवर'

ABOUT THE AUTHOR

...view details