महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर विभागातील दुहेरीकरण कामामुळे अनेक रेल्वेंच्या मार्गात बदल

सोलापूर विभागात सध्या होत असलेल्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण कामामुळे अनेक रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे रेल्वे विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

अनेक रेल्वेंच्या मार्गात बदल

By

Published : Aug 26, 2019, 12:37 PM IST

नांदेड - रेल्वेच्या सोलापूर विभागात सध्या होत असलेल्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण कामामुळे काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

गाडी क्रमांक - ११४०६ अमरावती ते पुणे ही रेल्वे सोमवारी २६ ऑगस्टला अकोला, भुसावळ, मनमाड, दौंड, पुणे अशी धावेल. तर गाडी क्रमांक ११४०५ पुणे ते अमरावती ही रेल्वे मंगळवारी २७ ऑगस्टला पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, अकोला अशी धावेल. गाडी क्रमांक ११४०३ नागपूर ते कोल्हापूर ही रेल्वे मंगळवारी २७ ऑगस्टला अकोला, औरंगाबाद, अंकाई, मनमाड, दौंड, पुणे, मिरज, कोल्हापूर अशी धावेल.

गाडी क्रमांक ११४०४ कोल्हापूर ते नागपूर ही रेल्वे सोमवारी २६ ऑगस्टला कोल्हापूर, मिरज, पूणे, दौड, मनमाड, अंकाई, औरंगाबाद, अकोला अशी धावेल. तर गाडी क्रमांक ११०११ लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड, ही रेल्वे बुधवारी २८ ऑगस्टला मनमाड, अंकाई, नांदेड अशी धावेल. गाडी क्रमांक ११०१२ नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस, ही रेल्वे गुरुवारी 29 ऑगस्टला नांदेड, अंकाई मनमाड अशी धावेल.

गाडी क्रमांक ११०७५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते बीदर, ही रेल्वे मंगळवारी २७ ऑगस्टला लोकमान्य टिळक टर्मिनस मनमाड, औरंगाबाद, अंकाई, परभणी, बिदर अशी धावेल. तर गाडी क्रमांक ११०७६ बिदर ते लोकमान्य टिळक टर्मिनस, ही रेल्वे बुधवारी २८ ऑगस्टला परभणी, औरंगाबाद, अंकाई, मनमाड अशी धावेल. तरी प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details