नांदेड - सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्यांमुळे रेल्वे प्रशासनाने दक्षिण मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. यानुसार नांदेड विभागातून सोलापूरकडे धावणारी निझामाबाद - पंढरपूर (५१४३३) एक्सप्रेस गुरुवार दि.२६ सप्टेंबरपासून पुढील तीन महिन्यापर्यंत रद्द करण्यात आली आहे. याबाबत दक्षिण मध्य रेल्वेने एका पत्रकात माहिती दिली असून, हा निर्णय पुढील तीन महिन्यांपर्यंत लागू आहे.
निजमाबाद-पंढरपूर एक्सप्रेस पुढील तीन महिन्यांसाठी रद्द - railway timetable
सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्यांमुळे रेल्वे प्रशासनाने दक्षिण मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. यानुसार नांदेड विभागातून सोलापूरकडे धावणारी निझामाबाद-पंढरपूर (५१४३३) एक्सप्रेस गुरुवार दि.२६ सप्टेंबरपासून पुढील तीन महिन्यापर्यंत रद्द करण्यात आली आहे.
सोलापूर विभागात धावणाऱ्या अधिकच्या मालगाड्यांमुळे रेल्वे प्रशासनाने दक्षिण मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केले आहेत
तसेच नांदेड ते दौंड गाडी (५७५१६) दिनांक २६ सप्टेंबर पासून पुढील तीन महिन्यांसाठी कोपरगाव पर्यंतच धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
दौंड ते नांदेड गाडी (५७५१५) दि .२७ सप्टेंबरपासून पुढील तीन महिने कोपरगाव ते नांदेड या स्थानकांदरम्यान धावणार आहे.