नांदेड - मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 1 ते 3 जून 2021 याकाळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.
हेही वाचा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुणांपेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्वाचा; राज्य सरकारची न्यायालयात भूमिका
या गोष्टी करा :
विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा.
जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.
आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या.
घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.
तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.
पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.