महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्थसंकल्प कृषीसाठी 'थोडा गोड अन जास्त कडू', शेतकरी नेत्यांच्या प्रतिक्रिया

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. कोरोना महामारीचा मोठा फटका कृषी क्षेत्राला बसला आहे. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

हनुमंत राजेगोरे  आणि अ‌ॅड. दिगंबर देशमुख
हनुमंत राजेगोरे आणि अ‌ॅड. दिगंबर देशमुख

By

Published : Feb 1, 2021, 9:56 PM IST

नांदेड - लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तरी देखील कुठलीही ठोस घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली नाही. या संकटाच्या काळात सरसकट वीजबिल माफी व कर्जमाफी या सारख्या घोषणेची अपेक्षा होती. पण तसा कुठलाच निर्णय नाही. त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला या घोषणेचा नेमका किती वाटा येईल हा संशोधनाचा विषय आहे. ऊस आणि साखर कारखानदारी याबाबतीत काहीच घोषणा नाही. महाराष्ट्र आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प आहे. थोडा गोड आणि जास्त कडू असा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांनी दिली आहे.

शेतकरी नेत्यांच्या प्रतिक्रिया

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. कोरोना महामारीचा मोठा फटका कृषी क्षेत्राला बसला आहे. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

कृषी क्षेत्रातील मोठ्या घोषणा

  • कृषी क्षेत्राबाबत घोषणा करताच विरोधकांनी संसदेत घोषणाबाजी सुरू करत गोंधळ घातला.
  • कृषी मालाला दीडपट किमान आधारभूत किंमत कृषी क्षेत्रातील मोठ्या घोषणा -
  • कृषी क्षेत्राबाबत घोषणा करताच विरोधकांनी संसदेत घोषणाबाजी सुरू करत गोंधळ घातला.
  • कृषी मालाला दीडपट किमान आधारभूत किंमत
  • 2020-21 आर्थिक वर्षात गहूत्पाद शेतकऱ्यांवर ७५ लाख खर्च केले. याचा फायदा सुमारे ४३ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना झाला.

हेही वाचा-संकटाचं संधीमध्ये रुपांतर कसं करतात हे दाखवणारा अर्थसंकल्प – देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details