नांदेड -रेती चोरी करणाऱ्या २४ शेतकऱ्यांसह अनेक मजुरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड तालुक्यातील भनगी गावात महसूल अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी छापा टाकत रेतीची मोठी तस्करी उघड केली. महसूल आणी पोलिस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
भनगी गावातील 24 शेतकऱ्यांनी शेकडो मजुरांच्या टोळ्यां गावात आणल्या आहेत. या मजुरांच्या मदतीने गोदावरी नदीतून रेतीचा उपसा केला जात होता. या प्रकरणी महसूल खात्याच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. रेतीची चोरी आणि पर्यावरण कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल झाल्या नंतर आजही या भागात रेतीची चोरी सुरूच असल्याचे चित्र आहे.