महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये मतदान करताना फेसबुकवर केला फोटो अपलोड, गुन्हा दाखल - loksabha

शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयात निवडणूक प्रक्रिया सुरू असताना एकाने मतदान करतानाचे फोटो काढून ते फेसबुकवर अपलोड केले होते.

नांदेडमध्ये मतदान करताना फेसबुकवर केला फोटो अपलोड, गुन्हा दाखल

By

Published : Apr 22, 2019, 10:06 AM IST

नांदेड - जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेत मतदान करतानाचे छायाचित्रण करण्याचा प्रकार घडला आहे. शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयात निवडणूक प्रक्रिया सुरू असताना एकाने मतदान करतानाचे फोटो काढून ते फेसबुकवर अपलोड केल्याप्रकरणी वजिराबाद ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदान करताना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असताना एका व्यक्तीने मतदान केंद्रात मोबाईल नेला. त्याचवेळी मतदान करीत असताना छायाचित्रण केले, हे छायाचित्रण फेसबुकवरही अपलोड केले. या प्रकरणी क्षेत्रीय अधिकारी प्रकाश गच्चे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details