नांदेड - उमरी तालुक्यातील कळगाव येथे एका अल्पवयीन मुलीचा गावातील तरुणाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून या नराधमास अटक केल्याची माहिती उमरी पोलिसांनी दिली आहे. त्याच्याविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - उमरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग
उमरी तालुक्यातील कळगाव येथे एका अल्पवयीन मुलीचा गावातील तरुणाने विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. पीडितेने याची माहिती आपल्या आईला दिली. यानंतर पीडितेच्या आई-वडिलांनी उमरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी उमरी तालुक्यातील कळगाव येथील रहिवासी आहे. घरात लागणाऱ्या वस्तूंसाठी तिचे अधूनमधून किराणा दुकानात येणे-जाणे होते. येथील तीस वर्षीय आरोपी या पीडित मुलीवर नजर ठेवून होता. अखेर त्याने या मुलीला स्वतःच्या दुकानात बोलावून शटर लावून घेतले आणि बाहेर पडण्यास विरोध करत तिचा विनयभंग केला. तसेच, हा प्रकार कुणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची माहिती पीडित मुलीने आपल्या आईला सांगितली. यानंतर पीडित मुलीच्या आई-वडिलांनी थेट उमरी पोलीस ठाणे गाठले आणि संशयिताच्या विरोधात तक्रार दाखल दिली.
या प्रकरणी उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत्रे यांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.