नांदेड -भोकर येथील महिला वनरक्षकाकडे पैशाची मागणी करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. शुभांगी देबडवार असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
महिला वनरक्षकाला खंडणी मागणाऱ्या माहिलेवर गुन्हा दाखल - भोकर खंडणी न्यूज
महिला वनरक्षकाकडे पैशाची मागणी करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. शुभांगी देबडवार असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव असून ती भ्रष्टाचार निर्मुलन समितीशी संबधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
वनरक्षक माहिला निता दादाराव केंद्रे या भोकर वनपरिक्षेत्र कार्यालयात तैनात आहेत. त्या वनपरिक्षेत्र कार्यालयात शासकीय कामकाज करत असताना नांदेड भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या शुभांगी देबडवार (रा. नांदेड) कार्यालयात आल्या. देबडवार यांनी वनरक्षक निता केंद्रे यांना तुम्ही बोगस लेबर वापरुन लाखोंचा अपहार केला आहे. या प्रकरणी मी सुरू केलेले उपोषण मागे घेतले म्हणून तुम्ही कारवाईपासून बचावल्या. त्यामुळे तुम्ही मला पैसे द्या, अशी मागणी केली.
याला केंद्रे यांनी नकार देताच, तुमच्या सर्वांच्या नोकऱ्या घालवेल अशी धमकी देबडवार यांनी दिली. तसेच केंद्रे यांना धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरून आरोपी शुभांगी देबडवार या महिलेविरुद्ध भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शालिनी गजभारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.