नांदेड -नायगाव तालुक्यातील कुष्णुर येथील 'इंडिया मेगा ॲग्रो' धान्य घोटाळ्याप्रकरणी सीआयडी पथकाने १९ जणांविरुद्ध १५०० पानांचे पहिले दोषारोपपत्र दाखल केले आहे. या गुन्ह्यातील आठ आरोपी औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात बंदिस्त आहेत. तर, उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे. हे या गुन्ह्यातील पहिलेच मूळ दोषारोपपत्र असून सीआयपीसी १७३(आठ) नुसार या प्रकरणाचा तपास सुरू राहणार आहे. पुढील तपासात महसूलचे काही अधिकारी व कर्मचारी अडकण्याची चिन्हे आहेत.
नांदेड : इंडिया मेगा ॲग्रो धान्य घोटाळ्याप्रकरणी १९ जणांविरुद्ध दोषारोप पत्र दाखल - raju parsewar
नायगाव तालुक्यातील कुष्णुर येथील 'इंडिया मेगा ॲग्रो' धान्य घोटाळ्याप्रकरणी सीआयडी पथकाने १९ जणांविरुद्ध १५०० पानांचे पहिले दोषारोपपत्र दाखल केले आहे. पुढील तपासात महसूलचे काही अधिकारी व कर्मचारी अडकण्याची चिन्हे आहेत.
कृष्णूर येथील इंडिया मेगा ॲग्रो धान्य कंपनीवर स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणारे शासकीय धान्य मोठ्या प्रमाणात खासगी व्यवसायासाठी वापरल्याचा आरोप आहे. तत्कालीन पोलिस अधिक्षक चंद्रशेखर मीना यांनी आपल्या पथकासह १८ जुलै २०१८ रोजी या कंपनीवर छापा मारला होता. या छाप्यात त्यांनी स्वस्त धान्याने भरलेले दहा ट्रक जप्त करुन ११ चालकांना अटक केली होती. चालकांसह कंपनीचे मालक,व्यवस्थापक आणि पुरवठादार यांच्याविरुद्ध कुंटूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाचा तपास नंतर औरंगाबादच्या सीआयडी पथकाकडे सोपवण्यात आला होता. या पथकाच्या अधिक्षक लता फड, पोलीस उपअधिक्षक आय.एन. पठाण, आर.एन.स्वामी, एस.आर.काटकळमकर आदींनी मुख्य आरोपी अजय बाहेती, जयप्रकाश तापडिया, राजू पारसेवार, ललित खुराणा यांना १० मे रोजी, तर नाका ठाकूर,भोसले रमेश, विजय शिंदे.इस्माईल, नागोराव विप्तल यांना १ जून रोजी अटक केली होती. या प्रकरणात सीआयडीने ९० दिवस पूर्ण होताच दोषारोप पत्र दाखल केले आहे.